येथे क्लिक करा →
मी, सौ. स्वाती अनंत टकले, गेली अनेक वर्षे याच प्रभागात वास्तव्य करत असून येथील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा मला जवळून माहीत आहेत. मी शिवसेना एकनाथजी शिंदे गटाची निष्ठावान कार्यकर्ती म्हणून पक्षाच्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख विचारधारेनुसार सातत्याने कार्य करत आले आहे. सामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करणे हाच माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे.
लोकशाही व्यवस्थेचा खरा पाया हा स्थानिक स्वराज्य संस्थांवर उभा असतो.
नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना सर्वांत जवळून जाणून घेणारा, त्यावर त्वरित व परिणामकारक उपाय करणारा प्रतिनिधी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४१ हा भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या विविधतेने नटलेला प्रभाग असून येथे केवळ आश्वासनांचे नव्हे तर कृतीशील, संवेदनशील आणि निर्णयक्षम नेतृत्वाची नितांत गरज आहे.
जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करत असताना ग्रामीण व नागरी भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच सामाजिक प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर शासन नियुक्त नगरसेविका म्हणून पुणे महानगरपालिकेत काम करताना महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा, अर्थसंकल्पीय नियोजन, विविध विभागांशी समन्वय आणि ठरावांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सखोल अनुभव मला प्राप्त झाला.
या सर्व अनुभवांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रभावीपणे काम करण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली आहे. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे, त्यावर तात्काळ पाठपुरावा करणे आणि दीर्घकालीन, शाश्वत उपाययोजना राबवणे हे माझे प्राधान्य राहिले आहे.
मी सुशिक्षित असून माझे शिक्षण, प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक जाणीव यांचा उपयोग प्रभाग क्रमांक ४१ च्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा माझा ठाम संकल्प आहे.
स्वच्छता, सुरक्षितता, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. नागरिकांचा विश्वास, अनुभवाची शिदोरी आणि विकासाची स्पष्ट दृष्टी या बळावर
प्रभाग क्रमांक ४१ ला अधिक सक्षम, समृद्ध आणि आदर्श प्रभाग बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
नागरिकांच्या अपेक्षा ओळखून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते प्रकाश व्यवस्था आणि सार्वजनिक सोयींमध्ये सुधारणा करत प्रभावी विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.
मुलांसाठी खेळाची साधने, ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याची व्यवस्था असलेले नवीन उद्यान उभारण्यात येइल..
स्थानिक कलाकार, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके व सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज नाट्यगृह विकसित करण्यात येईल.
जुन्या व जीर्ण पाईपलाईन बदलून नव्या व मजबूत पाईपलाईन बसवण्यात येतील.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी, आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देण्यात येईल.
पालकांच्या अडचणी समजून घेत वडाचीवाडी वाट येथील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी.
उंड्री परिसरातील ड्रेनेज लाईन चे उद्घाटन
न्याती सोसायटी, पुणेकर चौक येथे प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी पाहणी व मार्गदर्शन.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कड नगर चौक ते ऑर्चेस पॅलेस रस्त्यावर अंडरग्राउंड केबल कामाचे उद्घाटन.
पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी संस्कृती स्कूल परिसरात नव्या पुलाचे काम
सुरक्षित व प्रकाशमान परिसरासाठी गोदरेज ग्रीन सोसायटी येथे स्ट्रीट लाईट कार्यान्वित.
स्वस्त दरात शिलाई मशीन व गिरणी वाटपाचा कार्यक्रम आमदार विजय बापूशिवतारे यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडला.
माझ्या जिल्हा परिषद निधीतून ग्रा.पं.उंड्री येथे घंटागाडी उपलब्ध करून दिली